Ad will apear here
Next
काळेकरडे स्ट्रोक्स
मध्यमवर्गीय कुटुंबातील कॉलेजला जाणाऱ्या युवकाच्या जीवनात अनेक मित्र-मैत्रिणी येत असतात. अशा वेळी घरची ओढ कमी होत जाते आणि बाहेरच मन गुंतते; पण हे गुंतणे कधी कधी अपूर्ण राहते आणि जीवन कोरडेपणाने पुढे चालू राहते.

प्रणव सखदेव यांच्या ‘काळेकरडे स्ट्रोक्स’मधील समीरच्या कॉलेज आयुष्यातही सानिका व चैतन्य येतात. गर्भश्रीमंत सानिका आणि अंध चैतन्य एकमेकांवर प्रेम करीत असतात. म्हणूनच चैतन्यचे अपघाती निधन झाल्यानंतर ती समीरच्या रूपात त्याला पाहते. पुढे समीरच्या आयुष्यात सलोनी येते. ‘हिपिटायटीस बी’चा व्हायरस तिच्या शरीरात असतो. समीरच्या साथीने तिचे जीवन फुलते, रोगाचा धोका कमी होतो. याचकाळात समीर सानिकाचा शोध घेत मुळशीला पोचतो. तिथे तिच्या मृत्यूने मुळापासून हलतो. हिमाचल प्रदेशात तडकाफडकी निघून गेलेला समीर दादूकाकामुळे पुन्हा माणसात येतो; मात्र तोपर्यंत सालोनीही दूरदेशी गेलेली असते. फिल्म बनविण्याचे त्याचे स्वप्न प्रत्यक्षात येते, तरी मनात एक उदास पोकळीचे ओझे बाळगूनच तो जीवन जगात राहतो.
       
प्रकाशन : रोहन प्रकाशन
पृष्ठे : २१९
मूल्य : २५० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZQOBU
Similar Posts
माझं तालमय जीवन- झाकीर हुसेन बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याचे वडील खूप आजारी पडले. त्यामुळे बाळ अपशकुनी ठरले. हे बाळ म्हणजेच भविष्यात तबलावादक, संगीतकार व तालतज्ञ म्हणून जगभरात ख्यातकीर्त झालेले झाकीर हुसेन आणि त्यांचे वडील म्हणजे पंडित अल्लारखाँ. वडिलांशी असलेले नाते उलगडत त्यांनी स्वतःचा जीवनपट ‘माझं तालमय जीवन’मधून उलगडला आहे.
कलामांचं बालपण उत्तम शिक्षक, बुद्धिमान शास्त्रज्ञ, मिसाइल मॅन, महान राष्ट्रपती अशी सर्व विशेषणे लागू होणारी एकमेव व्यक्ती म्हणजे डॉ. एपीजे अब्दुल कलाम. त्यांच्यासारखी महान व्यक्ती कशी घडत गेली हे ‘कलमांचे बालपण’मधून सांगताना सृजनपाल सिंग यांनी छोट्या कलामचे भावविश्व, उलगडले आहे. त्यांच्या लहानपणीच्या अनेक रंजक गोष्टी यात आहेत
घनगर्द भय आणि अद्भुतता यांचे मिश्रण असणाऱ्या कथा हे हृषीकेश गुप्ते यांचे वैशिष्ट्य ‘घनगर्द’ कथासंग्रहातील कथांमधून जाणवते. पहिल्या ‘घनगर्द’ या कथेतून पौगंडावस्थेतील गार्गीला आपण खोल दरीत पडत आहोत, बचावासाठी धावलेल्या बाबाचाही तोल जातो, अशी जाणवणारी भीती व वास्तवात ज्या प्रसंगांना सामोरे जावे लागते त्यातून होणारी तिची घालमेल दिसते
‘चांगल्या साहित्याला वाचकवर्ग आहे’ पुणे : ‘वाचन जागर अभियानासारख्या उपक्रमांची सध्या गरज आहे. सोशल मीडियामुळे वाचन आणि लेखनावर परिणाम झाला असला तरी चांगल्या साहित्यासाठी वाचकवर्ग आजही आहे. सध्या ई-बुक, किंडल अशा वेगवेगळ्या माध्यमांमधून वाचन शक्य आहे. त्या माध्यमांचा वापर करून का होईना, लोकांनी दर्जेदार वाचावे,’ अशी अपेक्षा ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language